Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरमहाराष्ट्रवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

कोरोनाचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात आज वीकेंड लॉकडाऊन असणार आहे.

आज शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळत सर्व बंद राहणार आहे.

महिन्यातील सर्व विकेंडला हे निर्बंध असणार असल्याचा आदेश राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केला आहे.

आज (दि.9 एप्रिल) रात्रीपासून अत्यावश्यक सोडून सर्व दुकाने रात्री 8 नंतर बंद होतील. महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असेल.

– वैद्यकीय सुविधा सुरू राहणार
– भाजीपाला दुकान / मंडई बंद
– हॉटेल, बार, रेस्टॉरंट मधून घरपोच पार्सल सेवा मिळणार
– स्विगी आणि झोमॅटो यांच्यामार्फत पार्सल सेवा सुरू राहील
– सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मद्य विक्रीचे दुकान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या                 नियमाप्रमाणे घरपोच सेवा देणार
– घरेलू कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, जेष्ट नागरीक, वैद्यकीय मदतनीस यांना सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत प्रवास करता येईल
– स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मेस मधून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल घेता येणार
– PMPL सेवा अत्यावश्यक सेवा वगळून शनिवार रविवार बंद राहणार
– अत्यावश्यक सेवा कारणास्तव ओला / उबेर सुरू राहणार
– कामगारांना प्रवास करताना RTPCR प्रमाणात सोबत बाळगावे लागणार
– कोरोना नियम पाळून औद्योगिक वसाहत सुरू राहणार

नागरिकांचा बेजाबदारपणा पाहता पोलीस यंत्रणाही विकेंड लॉकडाऊनसाठी सज्ज झाली आहे.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं -चंद्रकांतदादा पाटील

Vishal Khandagale

पोलिसांच्या मारहाणीत रुग्णवाहिका चालकाच्या वडिलांचा मृत्यू !

Vishal Khandagale

पुणे,मुंबई वगळता इतर भागात एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी !