पुणे शहरात वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
त्यापैकी एक पीएमपीएमएल सात दिवसा करिता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएल सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि माजी आमदार शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये असणाऱ्या मोकळ्या बसमध्ये जाऊन आंदोलन केलं.
सामान्य पुणेकरांसाठी बस सेवा करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय.
जर ही सेवा सुरू केली नाही तर उद्या शहरभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी खासदार गिरीश बापट यांनी दिलाय.

