आरोग्यकोरोनापुणे शहर

नायडू रुग्णालयातील ” त्या” 22 जणांच्या मृत्यूची चौकशी करा

पुणे शहर :- नायडू हॉस्पिटलमध्ये 22 रुग्णांचा आक्सिजन अभावी मृत्यू झाला महापालिका प्रशासन लपवा लपवी करत आहे. पुणे महानगर पालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये अनागोंदी कारभारामुळे 22 रुग्णांचा मृत्यू याबाबत आयुक्तांना आज निवेदन दिले.

कोरोना काळात अनेक लोकांवर मृत्यूची वेळ येत आहे. नायडू हॉस्पिटलमध्ये गोरगरीब लोक उपचार घेण्यासाठी येतात. त्यांच्या वरील उपचारासाठी पैसे खर्च करू शकत नाही म्हणून महापालिका रुग्णालयात विश्वास ठेवून दाखल होतात. परंतु महापालिका अशा गोरगरीब जनतेला अंधारात ठेवून व खोटे सांगून खरी माहिती लपवून गोरगरीब जनतेच्या मृत्यूशी खेळत आहेत.

दि. 14 व 15 एप्रिल 2021 रोजी नायडू हॉस्पीटल येथे जवळपास 22 रुग्णाचा मृत्यू झाला. हे झालेले मृत्यु हे संशयास्पद आहेत. कारण नायडू मधील ओक्सिजन प्लांटमध्ये बिघाड झाला होता, त्यावेळी कमला नेहरू, बाणेर आणि दळवी हॉस्पीटल मधून जंबो ऑक्सिजन मागविण्यात आले. पण या दरम्यान अनेक रूग्ण मृत्युमुखी पडले.

याविषयी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी याना योग्य ती शिक्षा मिळावी अशी मागणी  महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना उपमहापौर यांच्या उपस्थितीत  महत्वपूर्ण निवेदन दिले या वेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते  दत्ता पोळ तसेच नीलेश  अल्हाट, शाम गायकवाड, शैलेश चव्हाण, सुजित यादव, गोविंद साठे, प्रमोद कदम इ. प्रमूख उपस्थीत होते.

Related posts

कोरोनामुळे मुंबई सह “एकुण” मृत्यू !

Vishal Khandagale

कोरोना : डॉ.नायडू रुग्णालय 100% फुल !

Vishal Khandagale

लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX