CORONA HELPकोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग! उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधला.

उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? :

● उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार आहे, या महिन्यात महाराष्ट्रात 18 लाख लसीचे डोस मिळणार आहेत.

● आज आपल्याकडे 3 लाख लसीचे डोस आले आहेत. आपल्या राज्यात 18 ते 44 वयोगटातील सुमारे 6 कोटी नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत.

● आज जर महाराष्ट्राला 12 कोटी लसीचे डोस देण्याची तयारी असेल तर आमची एक रकमी चेक देऊन ती घेण्याची तयारी आहे.

● पंतप्रधानांनी आपल्या दोन मागण्या मान्य केल्या आहेत. तर देशात महाराष्ट्र लसीकरणाच्या बाबतीत 1 नंबरचे राज्य आहे.

● तिसरी लाट येणारच नाही असे कोणी सांगू शकत नाही, त्याला तोंड देण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे.

● सात कोटी लाभार्थ्यांना मोफत गहू – तांदूळ वाटपाचे काम सुरु केले आहे.

● राज्यात 890 शिवभोजन केंद्रे सुरु झाली आहेत.  शिवभोजन मोफत दिल्यानंतर 15 लाख लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे.

● राज्याचे हीत साधत असेल तर इतरांचे अनुकरण करण्यात काही गैर नाही. आणखी काही दिवस तरी राज्यातील जनतेला निर्बंध पाळावे लागणार आहेत.

Related posts

भाजपाच्या मुळेच पुण्यात कोरोनाचे थैमान आणि पुणेकरांचे हाल! -शिवसेना

Vishal Khandagale

दिलासादायक ! पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

Vishal Khandagale

कांजूर कारशेडच्या कामाला मुंबई हायकोर्टाची स्थिगिती

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX