पुणे शहर :- पुणे धर्मप्रांत, चर्च ऑफ नॉर्थ इंडिया ,बिशप रा.रेव्ह. पॉल दूपारे यांच्या मार्गदर्शनखाली पुणे शहरात कोरोना विरुद्ध च्या लढाई मध्ये प्रशासनाला हातभार म्हणून पुणे पोलिस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व पोलिस ठाणे व पोलिस चौकी, यांना निर्जंतुकीकरण (Sanitize) करण्याची जबाबदारी हाती घेतली आहे.
आज दिनांक १५ मे २०२१ रोजी या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली व पुणे छावणी पोलिस ठाणे, पुणे छावणी सह आयुक्त कार्यालय, उप आयुक्त कार्यालय झोन २, पुलगेट पोलिस चौकी, चारबावडी पोलिस चौकी, सोलापूर बाजार पोलिस चौकी या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याचे काम करण्यात आले तसेच पुण्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन च्या अंतर्गत असणाऱ्या पोलीस चौकीचे निर्जंतुकिकरण केले जाणार आहे येत्या दोन तीन दिवसात ख्रिस्ती समाजातील व इतर गरजू कोरोना बाधित रुग्ण यांच्या साठी २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर कार्यात सेंट मॅथ्यूज मराठी चर्च चे सचिव ऍड.विक्रम अमोलीक यांनी आयोजन केले व त्यांचे सहकारी विल्सन ऍबनेस , प्रभाकर भालेराव ,आशुतोष विपत , डॉ.संजय साठे ,विनोद पवार यांचा मोलाचा सहकार्य लाभले.




