Pune City News
कोरोनापुणेपुणे शहर

विभागीय आयुक्त सौरभ राव यांना काल दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

पुणे शहर :- पुणे विभागीय आयुक्त पदावर कार्यरत असलेले सौरभ राव यांना मागच्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी दोन महिन्याआधी आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मागच्या शुक्रवारी पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती.

विभागीय आयुक्तांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच लस घेतल्यानंतरही एका आठवड्यात पुन्हा कोरोना झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरोना व्यवस्थापनामध्ये अनेक लोकांच्या संपर्कात आल्याने सौरभ राव यांना विषाणूचा संसर्ग झालेला असू शकतो, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

Related posts

21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? पंतप्रधानांनी दिल्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना

Vishal Khandagale

पहिल्या क्रांतिकारी विद्यार्थिनी ; यांचा पुतळा पुणे विद्यापीठात बसवा- विजय डाकले

Vishal Khandagale

लॉकडाऊन (टाळेबंदी) मध्ये पोदार शाळेच्या विद्यार्थ्यासाठी उपयोगी ठरतोय “ऑनलाइन अभ्यासक्रम !

Vishal Khandagale