Pune City News
गुन्हे विषयकपुणे शहर

माजी सैनिकांच्या जमिनीवर उभारला अनधिकृत बांधकाम प्रकल्प “मंत्रा बिल्डर” झाला गुन्हा दाखल !

पुणे महापलिका हद्दीतील धानोरी येथील मुंजाबा वस्ती सर्वे क्रमांक २९ येथे “मंत्रा 29 गोल्ड कॉस्ट “ नावे बांधकाम प्रकल्पाचे काम चालू असून या मध्ये भारतीय सैन्य दलातील अनेक माजी सैनिकांच्या खरेदीच्या जमिनी आहेत. हे सर्व माजी सैनिक आप-आपल्या मुळ गावी स्थायिक झाले आहेत. याचाच गैरफायदा घेऊन आरोपींनी पुणे महापालिका व जिल्हा भूमी अभिलेख चे अधिकारी यांनी संगमत करून पुण्यातील हा आदर्श जमीन घोटाळा केला आहे.

यामधील एक माजी सैनिक राजेंद्र सिंग यांच्या मालकीची देखील ९ गुंठे जमिन या प्रकल्पात आहे. सदर जमिनी बाबत मा.सर्वोच्च न्यायालया मध्ये २००९ साला पासून आज रोजी देखील दावा प्रलंबित आहे. याचाच फायदा घेऊन आरोपी यांनी मा. सर्वोच्च न्याया-लया मधील प्रलंबित दाव्याबाबत बनावट माहिती च्या आधारे पुणे जिल्हा भूमी-अभिलेख व पुणे महानगरपालिका अधिकारी यांच्यात संगनमत करून खोटे शपथपत्र सादर करून “मंत्रा २९ गोल्ड कॉस्ट “  हा  बांधकाम प्रकल्प मंजूर करून घेऊन जागा मालक याची फसवणूक केली.

या बाबत माजी सैनिक राजेंद्र सिंग यांचे कुलमुकत्यार धारक विशाल सत्यवान खंडागळे यांचे वकील डॉ.विक्रम अमोलिक यांनी मा. मा प्रथम वर्ग न्यायालय, खडकी  यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिले असता. मा. न्यायालयने  आरोपी याच्या वर कलम १५६ (३) नुसार विश्रातवाडी पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक अजय चांदखेडे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले

आज दिनांक ९ सप्टेंबर २०२१ रोजी  मा प्रथम वर्ग न्यायालय, खडकी  यांच्या आदेशाने विश्रातवाडी पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक अजय चांदखेडे  यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उप निरीक्षक राम सातपुते यांनी  मे. मंत्रा प्रॉपर्टीस चे  भागधारक  १ . रोहित घनशाम गुप्ता  २. मुकेश घनशाम गुप्ता ३. किशोर पोपटलाल गाडा  ४. निलेश पोपटलाल गाडा  व इतर  यांच्या विरुद्ध  विविध कालमान्वे  गुन्हा दाखल केला आहे

तसेच मा प्रथम वर्ग न्यायालय, खडकी यांच्या आदेशाने  तपासात पुणे जिल्हा भूमी-अभिलेख व पुणे महानगरपलिका अधिकारी दोषी आढळून आल्यास त्यांच्या वर देखील गुन्हा करण्यात यावा असे आदेश मा न्यायालयाने दिले आहे .

Related posts

कमांड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी ३३० बेड राखीव -आबा बागुल

Vishal Khandagale

शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी सातपर्यंत सुरु

Vishal Khandagale

पोलिसांनी केला ७ किलो गांजा जप्त !

Vishal Khandagale

Leave a Comment