पिपरी चिंचवडपुणे शहर

श्री अग्रसेन महाराज जयंती निमित्त सायकल रॅलीचे आयोजन

पुणे :-  श्री अग्रसेन महराज जयंती निमित्त अग्रवाल समाज फेडरेशन पुणे आणि श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणच्या वतीने पर्यावरणाचे संरक्षण आणि इंधन मध्ये बचत करण्याचा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आज सकाळी आयोजन करण्यात आले होते
सकाळी 5.30 वाजण्याच्या दरम्यान प्राधिकरण येथील अग्रसेन गार्डन येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विनोद बंन्सल, सचिव के. एल. बंसल, सुधिर अग्रवाल, अनिल मित्तल, दत्तुशेठ अग्रवाल, विजेंद्र बंसल, हिरालाल पाटील, नगरसेवक अनिल गावडे, राजू मिसाळ, माजी महापौर शैलेजा मोरे, शर्मिला बाबर आदीं यावेळी उपस्थित होते.

सदर रॅली प्राधिकरण वरून चिंचवड, पिंपरीगाव औंध मार्गे दगडूशेठ मंदीर येथे पोहचली आणि येथे  सायकल रॅली मध्ये सहभागी सर्वांनी दर्शन घेवून रॅली पुढे सारसबाग येथील महालक्ष्मी मंदीरात पोहचली. सदर रॅलीचे बोपोडी, दगडूशेठ आणि चिंचवड आदी ठिकाणी स्थानिक समाजाच्यावतीने स्वागत केले. महालक्ष्मी मंदीरात सदर सायकल रॅलीचे स्वागत अग्रवाल समाज फेडरेशन पुणेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले. नंतर सर्व सहभागी सायकलपट्टूं सोबत महालक्ष्मी मंदीरात आरती करण्यात आली. ही सायकल रॅली येथून पुन्हा जुना पुणे – मुंबई मार्गे बोपोडी येथून चिंचवड येथील अग्रसेन भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅली मध्ये सहभागी सर्वांनाचे मेडल देवून सन्मान करण्यात आले. तसेच श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणच्यावतीने भव्य रक्तदान शिबीराचे ही आयोजन करण्यात आले होते, ज्याचे उद्घाटन पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे आणि कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  यावेळी अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, प्रेमचंद मित्तल, विनोद मित्तल, वेद गुप्ता, नितू अग्रवाल आदी उपस्थित होते.

Related posts

दोघांना अटक: 2 काडतुसे, 2 पिस्टल जप्त

Vishal Khandagale

वायसीएमसमोर डॉक्टरांचे आंदोलन

Vishal Khandagale

आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX