PUNE CITY NEWS :- पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी परिसरात वडापावच्या गाडीवरून एका तरुणाचा खून झाल्याची घटना बुधवारी( दि.१९) रोजी रात्री घडल्याचे समोर आली आहे. काळेवाडीतील धोंडिराज मंगल कार्यालयात ही घटना घडली आहे.
शुभम जनार्धन नखाते ( वय ३०, रा. काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज तापकीर, ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय २३), प्रवीण धुमाळ (वय २१), अविनाश धनराज भंडारीे (वय २३), अजय भारत वाकोडे (वय २३), मोरेश्वर रमेश आष्टे (वय २१) सर्व रा. तापकीर चौक काळेवाडी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही शुभम नखाते आणि या आरोपींमध्ये परिसरात असणाऱ्या वडापावच्या गाडीवरून भांडण झाले होते. त्याचा वाद पुन्हा बुधवारी( दि.१९) रोजी दुपारी काढत भांडण केले.
बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान शुभम याला भेटण्यासाठी बोलावले. तो आल्यानंतर त्याच्यावर सपासप वार केले. वार खोलवर गेल्याने त्यातच त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शुभमचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले.

