Pune City News
पुणे शहरवडगावशेरी

सिध्दार्थनगर वासियांचा संपणार वनवास,आमदार सुनील आण्णा टिंगरे यांचा पाठपुरावा !

पुणे , वडगावशेरी मतदार संघातील प्रभाग क्र. 03 सिध्दार्थनगर रामवाडी येथील रस्ता बाधितांच्या पुर्नवसनाचा प्रश्न गेल्या 14 वर्षांपासून प्रलंबित आहे. या नागरिकांच्या पुर्नवसनासाठी आमदार सुनील आण्णा टिंगरे यांनी विविध माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केला. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही सरकारचे लक्ष वेधून या रहिवाशांचा वनवास संपवावा अशी मागणी केली. दरम्यान खराडी येथील काही गृहप्रकल्पांमध्ये आर-सेव्हन अंतर्गत महापालिकेच्या ताब्यात काही सदनिका आलेल्या आहेत. त्यात या रहिवाशांचे पुर्नवसन करावे अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन केली. याबाबत आयुक्तांनी पुढील आठवड्यात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. तत्पुर्वी सिध्दार्थनगर रहिवासी यांच्या समवेत शुक्रवारी सकाळी आमदार सुनील आण्णा टिंगरे यांची भेट घेऊन आण्णा करत असलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले. व नागरिकांच्या वतीने अभिजित रोकडे व महिलांनी आमदारांचा सत्कार केला.  यावेळी आमदार सुनील आण्णा टिंगरे नागरिकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे सांगितले

 

 

Related posts

धायरीत फॅन्सी फटका कारखान्याला आग

Vishal Khandagale

पाषाण तलाव परिसरासाठी मास्टर प्लॅन तयार करावा !- खासदार वंदना चव्हाण

Vishal Khandagale

आव्हानांचा सामना करण्यास पुणे मनपा सज्ज : चंद्रकांत पाटील

Vishal Khandagale