कोथरूडपुणे शहर

आव्हानांचा सामना करण्यास पुणे मनपा सज्ज : चंद्रकांत पाटील

पुणे शहर :- पुणे महापालिकेने ज्या पद्धतीने यंत्रणा उभारत आहे, ते पाहता आगामी काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी पुणे महापालिका सक्षम असल्याचा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

बाणेरमध्ये महापालिकेच्या माध्यमातून २०० बेड्सचे केविड केअर सेंटर उभारण्यात येत असून या सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ चंद्रकांतदादा पाटील यांनी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आज श्री. पाटील यांनी या सेंटरची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे,नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, नगरसेविका ज्योती कळमकर स्वप्नाली सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर आदी उपस्थित होते.

Related posts

पुणे धर्मप्रांत(CNI) वतीने शहरातील पोलिस स्टेशनचे निर्जंतुकीकरण !

Vishal Khandagale

शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale

दिलासादायक … नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त !

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX