Pune City News
गुन्हे विषयकपुणे

खराडी येथील कोविड सेंटर रुग्णालयावर स्थानिक नागरिकांची दगडफेक

PUNE CITY NEWS :-  खराडी येथे ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज होत असल्याच्या कारणामुळे ज्या हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला ठेवण्यात आले होते. त्या रुग्णालयावर नागरिकांनी दगडफेक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खराडी येथे असलेल्या या रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असते.

दररोज ऑक्सिजनची गाडी ऑक्सिजन सिलेंडर देण्यासाठी येत असते. त्यामुळे रिकामे सिलेंडर गाडी टाकताना प्रचंड आवाज येतो. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. मात्र सोमवारी( दि.१७) रोजी नागरिकांना त्रास सहन न झाल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या रुग्णालयावर दगडफेक केली.

या दगडफेकीनंतर रुग्णालयाचे व्यवस्थापक उमेश गिरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Related posts

आकुर्डी भरदिवसा खून!

Vishal Khandagale

जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर देशात प्रथम

Vishal Khandagale

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारिणी जाहीर.

Vishal Khandagale

Leave a Comment