गुन्हे विषयक

WhatsApp वर Online हुक्का विक्रीचा पर्दाफाश !

Pune City News:- पुणे शहरात Online संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरु असलेल्या हुक्का विक्रीच्या धंद्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत त्यांच्याकडून ६ हुक्का पॉट, सहा पाकीट तंबाखूजन्य फ्लेवर, चार मोबाईल फोन दोन मोपेड गाड्यांसह ८४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

मित विजय ओसवाल (वय १९ रा. वानवडी बाजार पुणे), रॉयल जयराम मधुरम (वय -२८ रा. लुल्लानगर कोंढवा) आणि परमेश महेश ठक्कर (वय २४ रा. भवानी पेठ पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

लॉकडाऊन काळात पुण्यात चक्क हुक्क्यची होम डिलिव्हरी सुरु होती. जिथं नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळणं अवघड झालंय. तिथंच ऑनलाइन हुक्का डिलिव्हरी तेजीत सुरू होती.व्हाट्स हॉट या संकेतस्थळावर ऑनलाइन हुक्का विक्री केली जात होती. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related posts

खंडणी उकळणाऱ्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई,

Vishal Khandagale

पुणे शहर १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, चार गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ निरीक्षकपदी पदोन्नती

Vishal Khandagale

सनी हिवाळे टोळीवर मोकाची कारवाई

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX