पुणे शहर :- सीबीएसई पाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे.
● बारावीची परीक्षा 23 एप्रिलला होणार होती. कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेऊन ती पुढे ढकलली. नुकत्याच केंद्राने सीबीएससीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
● राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

