गुन्हे विषयकपुणे

एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

संभाजी ब्रिगेड च्या वतीने कोंढवा पोलीस स्टेशन ला मिलिंद रमाकांत एकबोटे विरोधात गुन्हा दाखल कलम १५३, १५३अ, १५३ब, २९५अ, २९८, ५००, ५०१, ५०२, ५०५(१)(क), ५०५(२) व ३४ & १२०ब भारतीय दंड संहिता, १८६० & कलम ६६अ व ६६ब माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत संभाजी ब्रिगेड चे उपाध्यक्ष सतीश काळे यांनी कोंढवा पोलिस स्‍टेशन येथे  फिर्याद दाखल केली

मिलिंद रमाकांत एकबोटे (समस्‍त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष) यांनी जाणीवपुवर्क व हेतुपुरस्करपणे बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवून मनुष्य हानी आणी वित्त हानी करण्याच्या उददेशाने व हेतुने लोकांना एकत्र संघटीत केले.

गैरमार्गाने बेकायदेशीररित्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछुट, बेताल वक्तव्य करुन एका विशिष्‍ठ धर्माविरुध्द बदनामी केली. सदरील भाषणाचे चित्रिकरण करुन ते सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारीत केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

यावेळी कायदेशीर मदत ॲड तोसीफ शेख, ॲड क्रांती सहाणे,ॲड दीप्ती काळे, ॲड स्वप्नील गिरमे, ॲड सुरज जाधव, ॲड दीपक गायकवाड यांनी केली. तसेच सतीश गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष, रिपाई(आय), आय.टी.शेख, अध्यक्ष, पुणे जिल्हा, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, साबीर भाई सय्यद, अध्यक्ष, पुणे शहर, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, अभिमन्यू सूर्यवंशी,अध्यक्ष, क्रीडा विभाग,महाराष्ट्र,रिपाई(आय), बापूसाहेब भोसले (अध्यक्ष – दलित पॅन्थर ऑफ इंडिया),विजय जगताप (अध्यक्ष – मास मुमेंट),सलीम शेख , अध्यक्ष न्यू तिरंगा फौंडेशन, जमीर मोमीन , नूरानी फौंडेशन अमजद भाई शेख , अपना वतन संघटना, मूलनिवासी मुस्लिम मंच , गुलटेकडी जनजागृती समिती, भारतीय एकता महामोर्चा अध्यक्ष अल्ताफ भाई सय्यद कोंढवा पोलिस स्टेशन ला उपस्तित होते. शेख यांनी दिली.

 

Related posts

14 कोटींचा मास्कसाठा जप्त : गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale

कोरोना : पुण्यातील भोजनालयाला व रेशन वाटप केंद्राला भेटी : राज्यमंत्री विश्वजीत कदम

Vishal Khandagale

गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने महापालिकेला निर्जंतुकीकरण कक्ष भेट !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX