‘कोरोना’चा प्रकोप आता वाढत आहे. त्याविषयी सोशल मीडियावर विविध गोष्टींचा पाऊस पडत आहे. एवढी माहिती आदळत आहे की त्यात खरं काय आणि खोटं काय हे समजणं अवघड झालं आहे. अनेक जण कुठलीही शहानिशा न करता WhatsAppवर आलेले मेसेजेस सर्रास Forward करत असतात. असाच एक मेसेज पुढे पाठवणं एका शिक्षिकेला चांगलाच महागात पडलाय. ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू झाला असा मेसेज इतर ग्रपुवर पाठविणाऱ्या एका शिक्षिकेला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलं आहे. छत्तिसगड मधल्या कांकेर जवळच्या नरसिंहपूर या गावातली ही घटना आहे. हिमन कोराम असं त्या शिक्षिकेचं नाव आहे. तिला आलेले एक मेसेज तिने काही ग्रुपवर पाठवल्याचं उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
previous post
next post

