Pune City News
राष्ट्रीय

कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी !

PUNE CITY NEWS :- दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भारताने युनायटेड किंगडमला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या घरात पोहचली आहे.

रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ : सध्या भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख 98 हजार 205 इतकी झाली आहे. गेल्या आठवड्यात स्पेनला मागे टाकत भारत पाचव्या स्थानावर पोहचला होता. ही गोष्ट भारतासाठी अत्यंत चिंताजनक असल्याची बाब समोर येत आहे. तर अमेरिका, ब्राझील, रशियामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्येत सतत झपाट्याने वाढ होत आहे.

मृत्यू : जागतिक महासत्ता अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक जास्त फटका बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 20 लाख 89 हजार 701 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या देशात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील मृत्यूची संख्याही सर्वाधिक असून आतापर्यंत एक लाख 16 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझिलमध्ये 8 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रशियामध्ये पाच लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत.

Related posts

कोरोना टेस्टिंगबाबत आयसीएमआरची नवीन गाईडलाईन

Vishal Khandagale

अखेर रिया जेलच्या बाहेर

Vishal Khandagale

कोवीड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य वापर करावा

Vishal Khandagale

Leave a Comment