Pune City News
महाराष्ट्र

खासदार संजय राऊत अडचणीत; महिलेने केले गंभीर आरोप

खासदार

मुंबईतील एका महिलेने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या महिलेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून 7 वर्षांपासून राऊत आपला छळ करत असल्याचा आरोप केला आहे.

याप्रकरणी दोन रिट याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्या असून त्यावरील पहिली सुनावणी 4 मार्चला होणार आहे.

ॲड. आभा सिंह यांनी न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान एकदा आपल्यावर गंभीर शारीरिक हल्ला करण्यात आल्याचे महिलेने सांगितले.

याविषयी मुंबई पोलिसात तक्रार देखील केली होती. मात्र त्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप या महिलेने केला आहे.

तसेच राऊत यांच्या दबावाखाली येऊन मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला आहे.

Related posts

३ मे नंतर निर्बंध थोडे शिथील करणार !

ओबीसी आरक्षणास हात लावाल तर रस्त्यावर उतरू; हाके

Vishal Khandagale

राज्यात दहावीच्या निकालात यंदा तब्बल १८.२० टक्के वाढ

Vishal Khandagale

Leave a Comment