Pune City News
पुणे

ग्रामदैवत कसबा गणपतीचे देऊळ मनसेने उघडले

स्वतःला हिंदुत्त्ववादी समजणारी  आणि हिंदुत्त्ववाच्या नावावर मते मागणारी आणि आत्ता सत्ताधारी असलेली शिवसेना सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवत असल्याचे दिसत आहे.
सरकारने महसुलासाठी मद्यालये उघडली. मात्र कोरोनाचे नाव करून देवालये उघडायला घाबरते आहे; कोरोना काय फक्त देवळातच आहे का ? महाराष्ट्रातील  देवालये न उघडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यावर नक्की कोणाचा दबाव आहे ? हे आता कोणी सांगण्याची गरज नाही. तथाकथित हिंदू विरोधी विचाराची दोन्ही काग्रेसरुपी सहकारी आणि सत्तेसाठी मम म्हणणारी सेना हे आज च चित्र आहे.
महाराष्ट्रात सर्व व्यवसाय सुरु झाले आहेत.

मद्यालये, हॉटेल , दुकाने इतकेच नाही तर जे खाऊन थुकल्या नंतर करोना होऊ शकतो पसरू शकतो तो गुटखा हि सगळी कडे मिळू लागला आहे . मात्र करोना होईल किंवा पसरेल म्हणून मंदिरे बंद ठेवण्यास सरकार भाग पडत आहे.

गेल्या महिन्यातच महाराष्ट्रातील देवस्थानाची प्रमुख मंडळी  मनसे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे याना भेटली होती. त्या नंतर राजसाहेबांनी सरकारला मंदिरे सुरु करावीत हि मागणी देखील केली होती. परंतु अंतर्गत दबावा पोटी सरकार मंदिरे उघडू देत नाही. म्हणूनच आज मनसेने पुण्याचे ग्राम दैवत असणाऱ्या कसबा गणपती देऊळ आज उघडले व देवळात जाऊन प्रतीकात्मक होम करीत देवाला नागरिकांना करोना मधून लवकरात लवकर मुक्त कर व करोना मुळे आलेली बेकारी व महागाई यातून जनतेची सुटका कर हे साकडे घातले व सरकारने आता भक्तांचा अंत पाहू नये देवळे उघडावीत व देव मुक्त करावेत अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल  हा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला.

Related posts

शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांना अभिवादन

Vishal Khandagale

“श्रीं” ची प्राणप्रतिष्ठापणा प्रथमच अध्यक्ष, पदाधिकारी करणार

Vishal Khandagale

जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : डॉ. राजेश देशमुख

Vishal Khandagale

Leave a Comment