खडकवासलागुन्हे विषयकपुणे शहर

डुक्कर खिंड परिसरात भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

पुणे शहर :- वारजे डुक्कर खिंड परिसरात भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. (शनिवारी) आज  दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

बांधकाम व्यवसायिक रवींद्र सांगुदे यांच्यावर गोळीबार झाला आहे. सुदैवाने या घटनेत सागुंदे यांना कोणतीही इजा झाली नाही. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र सागुंदे हे आज सकाळी डुक्कर खिंड परिसरातील एका जागेवर थांबले होते. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या. सुदैवाने रवींद्र यांना या घटनेत कुठली दुखापत झाली नाही . गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर सागुंदे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हल्ला कोणी आणि का केला अद्याप समजू शकलेले नाही.?

Related posts

आलिशान सोसायटीची सुरक्षा करणारा सुरक्षा रक्षकच निघाला चोर !

Vishal Khandagale

शहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

Vishal Khandagale

अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर गुन्हा!

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX