Pune City News
गुन्हे विषयकपुणे

आलिशान सोसायटीची सुरक्षा करणारा सुरक्षा रक्षकच निघाला चोर !

” विमानतळ पोलीस ठाणे  चे तपास पथका कडुन जेरबंद” इसम नामे सौरभ कुंदेन हे त्यांचे कुटुंबिया समवेत मॅरिबल बिल्डींग, फ्लॅट नं १००१, न्याती एव्हिटा’ डि पी. रोड, लोहगाव पुणे या आलिशान सोसायटीत राहावयास आहेत. ते दिनांक  ३० / १२ / २०२० रोज़ी सायंकाळी ०५ : ०० वा ते दि. ३१/१२/२०२० रोज़ी सांयकाळी ०६ /०० वा.  चे
दरम्यान त्यांचे राहते फलॅटला कुलूप लावुन त्यांचे वडीलांना भेटण्यासाठी कुटुंबासह कात्रज या ठिकाणी गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे राहते घरात प्रवेश करुन बेडरुमधील कपाटात ठेवलेले २५ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेलेबाबत विमानतळ पोलीस ठाणे पुणे येथे फिर्यादी यांचे तक्रारी वरुन दिनांक ०७/०१/२०२१ रोज़ी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथक तांत्रिक विश्लेषणाचे व गोपनिय बातमीचे आधारे दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असताना फिर्यादी वास्तव्यास असलेल्या न्याती एव्हिटा सोसायटीतील पुर्वी सुरक्षा रक्षक म्हणुन काम करणारा इसम नामे संतोष ऊर्फ लारा काशिनाथ जाधव वय ३५ वर्षे रा पोरवाल रोड लोहगाव पुणे याचेकडे तपास करुन सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडे अधिक करता त्याने त्याचा साथीदार नामे संतोष ऊर्फ रॉकी अरुन धनवजीर वय ३४
निंबाळकर नगर लोहगाव पुणे याचे मदतीने घरफोडी चोरी करुन चोरलेले दागिने सोन्या चांदी चा व्यापारी अशोक गणेशलाल जानी वय ५४ वर्षे रा शनिवार पेठ सातारा यास ब्रिकी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन २० तोळे सोने किंमत रुपये १०, ००, ००० / – (दहा लाख रुपये) हस्तगत करण्यात आले आहेत। सदर आरोपीतांनी अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने त्यांचेकडे अधिक तपास करीत आहोत.

सदरची कारवाई ही मा. श्री. नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त परि. -०४ पुणे शहर, श्री किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये श्री गजानन पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर व श्री मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.उप.निरी. हणुमंत गिरी ,पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, उमेश धेंडे, रमेश लोहकरे, विशाल गाडे, संजय आढारी, विनोद महाजन सचिन भिंगारदिवे, नाना कर्चे, हरुण पठाण, राहुल मोरे, किरण अब्दागिरे वैभव खैरे, प्रशांत कापुरे  यांचे पथकाने केली आहे.

Related posts

पोलीस कोठडीतील आरोपीला सफरचंद, उपमा देणाऱ्या चार पोलिसांवर कारवाई

Vishal Khandagale

पुणे छावणी मधील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी..

Vishal Khandagale

पुणे जिल्ह्यात ३३ हजार ६९१ अक्टिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

Leave a Comment