कोरोनामहाराष्ट्र

..तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील

Pune City News:- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी महाविकासआघाडी सरकारमधील सर्व नेत्यांसह विरोधी पक्ष, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभार मांडले. सरकारने 24 तास जीवनावश्यक वस्तूंची दुकान सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र दुकानात गर्दी कमी झाली नाही. तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

◆ उद्धव ठाकरे म्हणाले ◆

◆ घराबाहेर पडू नका असं सांगणारा माणूस पुन्हा एकदा तुमच्या समोर आला आहे. आज जवळपास आठ दिवस होत आले.

◆ संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या संपूर्ण दिवसांमध्ये आपण आपल्या संयमांचं अतुलनीय दर्शन घडवलं आहात, त्यामुळे आपलं धन्यवाद.

◆ राज सुद्धा मला फोन करुन सूचना देतो. हे सर्व आपण एकत्र येऊन काम करुया, या भावनेने एकत्र आले आहेत. त्यामुळे या सर्वांनी मी धन्यवाद देतो,

◆ जेव्हा मी आपल्याशी बोलत असतो तेव्हा एक लक्षात घ्या. माझ्यासोबत आपण सर्व आहात. माझ्यासोबत महाविकासआघाडी सरकारमधील सर्व नेते आहेत.

◆ उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे सर्व आहेत. विरोधीपक्ष नेत्यांशी देखील माझी चर्चा सुरु आहे.

◆ सर्व कामगार आपल्या घऱी जाण्यासाठी उतावळे झाले आहेत. पण इतर राज्यातील मजूर, कर्मचाऱ्यांनी जिथे आहे तिथेच थांबावे. त्यांच्यासाठी राहण्याची, मोफत जेवणाची सोय महाराष्ट्र सरकार करत आहे.

◆ साखर कारखान्यांनी आपल्या कामगारांची सोय करावी. एका जिल्ह्यातून दुसरीकडे वाहतूक बंद करा. जीवनावश्यक वस्तू 24 तास सुरु आहेत, पण विनाकारण पोलिसांवर ताण वाढवू नका

◆ सरकार आपली मदत करत आहे, आपणही सरकारची मदत करा. केंद्राकडूनही चांगली मदत होत आहे. तसेच पुण्यातील डॉक्टरांचं कौतुक आहे.

◆ प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडा. केंद्र सरकार आपल्या संपर्कात आहे. केंद्राने ज्या योजना जाहीर केल्या आहे त्या आपण राज्यात राबवणार आहे.

◆ आपण जी केंद्र सुरु केली आहेत. तिथे आपण सर्वांना मोफत जेवण देत आहे. शिवभोजन आपण 10 रुपयांना देत होतो. मात्र आता ते आपण 5 रुपयांनी देत आहोत

◆आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. पण पुढचे काही दिवस आपल्याला जबरदस्तीची सुट्टी घेऊन घरी राहायचे आहे. पण या सुट्टीच्या दिवशीही डॉक्टर आपल्यासाठी काम करत आहेत,

Related posts

पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बस पेटली

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा : मा. शरद पवार साहेब

Vishal Khandagale

परदेशवारी नाही तरीही “करोना” लागणची लक्षणे !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX