गुन्हे विषयकपुणे

नौदलाचा अधिकारी असल्याचे भासवून लाखोंचा गंडा घळणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

PUNE CITY NEWS :- भारतीय नौदलाचा अधिकारी असल्याचे भासवून अनेक तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

राज्यातील विविध भागातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये कमवल्याची माहिती या भामट्यानी दिली आहे.

आकाश काशिनाथ डांगे (वय २५, रा.भाडळी बु॥ ता.फलटण जि.सातारा) आणि नितीन तानाजी जाधव (वय ३०, रा.कल्पनानगर, बारामती), अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. याबाबत किशोर दादा जाधव (रा.कुरकुंभ, ता.दौंड, जि.पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी आरोपींनी नौदल अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून अधिकारी असल्याचे भासवून अनेकांकडून लाखो रुपये उकळले. त्यात भिगवण आणि लोणावळा येथे एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा समावेश आहे.

त्यानंतर आयएनएस शिवाजी लोणावळा या नावाच्या बनावट नियुक्ती पत्र, मेडीकल पत्र व ॲडमीट कार्ड पाठवून नोकरी न लावता फिर्यादी तसेच अनेक बेरोजगारांची फसवणूक केली.

याबाबत फिर्यादी जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन त्यांना या फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती दिली होती.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक पाटील यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Related posts

महानगरपालिकेचे नवे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती

Vishal Khandagale

भाजीपाला, गाळेधारक इतर व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Vishal Khandagale

कोरोना: बाधित रुग्णांची पुष्टी होणार कीट ! बनवण्यात पुणेरी डॉ.मीनल दाखवे-भोसले यानां यश

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX