Pune City News
पुणे

पुणे शहरात एकाच दिवशी उच्चांकी ३९९ नवीन कोरोनाग्रस्थ

PUNE CITY NEWS

PUNE CITY NEWS :- पूणे शहर हद्दीत प्रथमच एकाच दिवसात उच्चांकी ३९९  कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. यामुळे पुणे शहराने कोरोनाबाधित रूग्णांचा पाच हजाराचा आकडा पार केला असून, सोमवारपर्यंत शहरात एकूण ५ हजार १८१ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

आज शहरात आढळून आलेल्या ३९९ रूग्णांमध्ये बहुतांशी रूग्ण हे कंटन्मेंट भागातीलच आहेत. पुणे शहरात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच, मात्र कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही मोठे आहे. सोमवारी १७९ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, आजपर्यंत शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही आता २ हजार ७३५ इतकी झाली आहे.

शहरात कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या जरी ५ हजार १८१ इतकी झाली असली तरी, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार १८२ इतकी आहे. यापैकी १७९ कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती गंभीर आहे़ तर ४४ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

Related posts

राज्य शासनाने महापालिकेला आर्थिक मदत करावी -महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . – आमदार सुनिल कांबळे

Vishal Khandagale

उपाययोजनेसाठीची माहिती दररोज अद्यावत करा : विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

Vishal Khandagale

Leave a Comment