पुणे

जम्बो कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव

PUNE CITY NEWS :- पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे होणारे हाल, त्यातून त्यांना गमवावा लागणारा जीव. यातून पुण्यातील कोविड सेंटरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नुकतेच पुण्यातील एका पत्रकाराचे कोरोनामुळे निधन झाले, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या कोविड सेंटरचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.जम्बो कोविड सेंटर अजून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे.

पुण्यातल्या प्रत्येक कोविड सेंटरमधून नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रुगांना वेळेत उपचार न मिळणे, औषधे वेळेत न देणे,मृतदेहाची अदलाबदल होणे, असे अनेक प्रकार कोविड सेंटरमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच शेवटच्या क्षणी नातेवाईकांना त्यांच्या रुग्णांचा चेहेराही दाखवला जात नाही. त्यामुळे नागरिकांमधून राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाच्या कार्यभरावर संताप व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील वाढत्या कोरोनाच्या सद्य स्थितीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. एवढा खर्च करून बांधण्यात आलेले कोविड सेंटरमध्ये सुविधांचा मात्र मोठा अभाव असल्याची वास्तवता पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागत आहे.
यायबत एका रुग्णांच्या नातेवाईकाने सांगितले की, शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या जंबो कोवीड सेंटरमध्ये कोणतीही सुविधा व्यवस्थित दिली जात नाही.रुग्णांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना आंघोळीसाठी पाणी नाही, नाश्ता वेळेत नाही, अशा अनेक असुविधा या कोविड सेंटरमध्ये पहायला मिळत आहे.अशा प्रतिक्रिया पेशंटच्या नातेवाईकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Related posts

वडापावच्या गाडीवरून काळेवाडी येथे तरुणाचा खून

Vishal Khandagale

येरवडा कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन

Vishal Khandagale

शिवराज्याभिषेक मनामनात शिवराज्याभिषेक घराघरात’ स्पर्धेचे आयोजन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX