पुणे

पुण्यातील महंमदवाडी परिसरात दहा गायींची कत्तल

महंमदवाडी मध्ये पहाटेच्या सुमारास १० गायींची कत्तल करण्यात आली आहे. गोरक्षक टीम व कोंढवा पोलिसांनी पहाटे छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला.

दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे व त्यांच्या सहकार्यांनी पोलिस व गोरक्षक पथकाला यावेळी महत्वाची मदत केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उंड्री कडनगर पेट्रोल पंपासमोर महंमदवाडी हद्दीतील मोकळ्या जागेतील एका बंद शेडमध्ये गायी, म्हैशी व अन्य जनावरांची कत्तल केली जाणार असल्याची खबर गोरक्षक सादिब मुलाणी, रुषीकेश कामठे यांच्या टीमला बातमीदाराकडून बातमी मिळाली होती.

पहाटे ३ वाजल्या पासून कोंढवा पोलिस ठाण्याचे पीएसआय चव्हाण व गोरक्षक टीम यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली होती. अखेर एका बंद शेडमध्ये गायी व अन्य जनावरांची कत्तल करताना आरोपींवर छापा टाकण्यात आला. यावेळी दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. अन्य आरोपी पळून गेले त्यांचा शोध कोंढवा पोलिस घेत आहेत.

Related posts

वजीर सुळका १५.३० मिनिटात कृष्णा मरगळे यांनी केला सर

Vishal Khandagale

“श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने तुकाईमाता देवस्थान प्रवेशक्षेत्राचे सुशोभीकरण

Vishal Khandagale

पोलीस कोठडीतील आरोपीला सफरचंद, उपमा देणाऱ्या चार पोलिसांवर कारवाई

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX