पुणे

मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली उपायुक्तांच्या गाडीची तोडफोड

अंत्यसंस्कारासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी महापालिकेच्या उपायुक्तांच्या वाहनाची आज ( सोमवारी) तोडफोड केली आहे.

वसंत मोरे यांचे नातेवाईक पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही महापालिकेकडून रुग्णवाहिका मिळाली नाही.

त्यानंतर मोरे यांनी स्वतः पाठपुरावा केल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्यानंतर रात्री उशिरा मुरतदेहवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुण्यात एका नगरसेवकाचे हे हाल असतील तर सर्व सामान्य नागरिकांचे काय हाल असतील असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी मोरे यांनी पालिका प्रशकीय अधिकाऱ्यांच्या कार्यभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

Related posts

कोरोना:-23 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द !

Vishal Khandagale

कोरोनाच्या पाश्वभूमीवर विविध त्रुटी संदर्भात पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने विभागीय आयुक्तना निवेदन

Vishal Khandagale

महापालिका प्रशासन सज्ज; कमला नेहरू रुग्णालयात होणार शुभारंभ

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX