महाराष्ट्रात रोजी-रोटी कमावतात, नाव कमवतात पण महाराष्ट्राचं ऋण मानत नसल्याचा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना रणौतला लगावला.
मुख्यमंत्री :
▪️ अनेकजण इतर प्रांतातून मुंबईत, महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात.
▪️ काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, तर काहीजण मानत नाहीत.
▪️ माजी आमदार, शिवसेना उपनेते अनिल राठौड राजस्थानहून इथे आले होते.
▪️ मुंबई, मंचर, त्यानंतर ते नगरला गेले. सर्वसामान्यांसाठी त्यांनी त्यांचं काम सुरु केलं.
▪️ शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्त्वाच्या विचाराने अनिल राठौड प्रेरित झाले होते. खूप चांगलं काम त्यांनी शिवसेनेत केलं,
दरम्यान, कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला होता.

