पुणे

शेतकरी संघटनांचा अंबानी इस्टेटवर मोर्चा धडकणार

२६ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ३० लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांना श्रद्धांजली म्हणून २० डिसेंबरला सायंकाळी राज्यातील गावागावात मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

मुबंईत उपजिल्हाधिकारी कार्यालयापासून बिकेसीतील अंबानी इस्टेटवर २२ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.

पुण्यात पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बाबा आढावसह आदी. उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले :

हे आंदोलन पंजाब,हरियाणा मधील शेतकऱ्यांच आंदोलन नाही तर सर्व देशातील शेतकऱ्यांच आंदोलन आहे.

व्यापक शेतकरी आंदोलन या अगोदर झाली नाहीत. आता ही लढाई काही राज्याची नाही, तर सर्व शेतकऱ्यांचे आहे. हे कायदे शेतकरी विरोधी आहेत.

हमीभाव कायदा बंधनकारक करावा, बाजारात हमीभाव पेक्ष्या कमी दराने शेतीमाल खरेदी करावा अशी मागणी आहे.

दरम्यान, या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेतकरी कामगार पक्ष व लोक संघर्ष मोर्चा या मुबंई मोर्चात सहभागी होणार आहेत.

Related posts

कोरोना : कर्मचार्‍यांसाठी मोफत बस सेवा !

Vishal Khandagale

वडगावशेरी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर पार !

Vishal Khandagale

इराणमधून “234” भारतीय मायदेशात!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX