पुणे- प्रतिनिधी :- पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवरून अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.
- यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, प्रत्येकाने काय ट्विट करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी घेतलेली भूमिका ही राष्ट्रवादीची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाला ट्विट करण्याचा अधिकार आहे.
- त्यांनी पुढे बोलतांना सांगितले की, अलीकडची मुले काहीही ट्विट करतात, प्रत्येक वेळी मुलाने ट्विट केले की विचारले जाते, मला तेवढाच उद्योग नाही, राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. असेही त्यांनी सांगितले.
- माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल ज्याला त्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे”. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

