महाराष्ट्र

मान्सूनने अवघा महाराष्ट्र व्यापला !

राज्यात दाखल मान्सूनने शनिवारी कोकणातून नगर, मराठवाड्यातील काही भागांतून विदर्भातील गोंदियापर्यंत धडक दिली. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यात अनेक भागांत पाऊस बरसत असून बळीराजा सुखावला आहे.

संततधार पावसाने नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी धो-धो पाऊस झाला. दुष्काळी भागातील मालेगाव, बागलाण, देवळा व सिन्नर तालुक्यात पावसाने जूनची सरासरीदेखील ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही काही ठिकाणी वरून कृपा झाली.

इशारा : पुढील 24 तासांत पुणे, मुंबईसह राज्यातील उर्वरित भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहार, दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात रविवारी (दि.14), तर पुणे जिल्ह्यातील घाट परिसराला 16 जूनला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

आज मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.15 आणि 16 जूनला कोकणासह पालघर, ठाणे, मुंबईत धो-धो पावसाची शक्यता आहे.

Related posts

राज्यातील बँका 10 ते 2 सुरू राहणार !

Vishal Khandagale

जानेवारीपासून शाळा सुरु करा; बच्चू कडू यांचा मुख्यंमंत्र्याना प्रस्ताव

Vishal Khandagale

कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही – नवाब मलिक

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX