महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत महाविकास आघाडी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

हे निर्णय…

● शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू.

● सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापण्यास मान्यता.

● महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ

● अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागास हस्तांतरीत करण्याचा निर्णय.

● पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विलीनीकरण

● कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मूलभूत मतदानापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी !

Vishal Khandagale

राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार, शिक्षणमंत्री

Vishal Khandagale

देशात 100% जनता कर्फ्यु !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX