महाराष्ट्र

राज्यातील शाळा सुरु होणार

महाराष्ट्र राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी नुकतीच दिली आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली होती.

मात्र राज्यात या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नोव्हेंबर महिन्याची वाट पहावी लागणार आहे.

कारण राज्यातील शाळा ह्या दिवाळीनंतरच सुरु होणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनास्थिती लक्षात घेता सध्या तरी राज्यातील शाळा प्रत्यक्ष उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी बैठकीत घेतल्याचे समजते.

Related posts

पुण्यात निवडणुकीपूर्वी प्रचंड राजकीय घोळ : उमेदवारी, जागावाटप आणि पक्षांतर्गत अस्वस्थता

Reporter pune

पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द!

Vishal Khandagale

महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, अन्यथा…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX