पुणे

विमाननगर मध्ये भामा-आसखेड चे पाणी दाखल.

वडगाव शेरी मतदार संघातील अनेक राजकीय घडामोडी नंतर भामा- आसखेड या स्वप्नपूर्ती प्रकल्पाचे पाणी विमाननगर मध्ये दाखल  दि. १८ रोजी सोडण्यात आले.  त्यामुळे विमानगर भागातील  सर्व रहिवासी सोसायट्या व परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. भविष्यात संपूर्ण प्रभाग ३  हा टॅंकरमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. असे प्रतिपादन नगरसेवक राहुल भंडारे यांनी केले  व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सदर प्रकल्पाचे जल पूजन  करून  टाकीत सोडण्यात आले.  सदर पाणी पुणे महानगरपालिकेने केलेल्या नकाश्याप्रमाणे निश्चित  वेळेनुसार  सोडण्यात येणार आहे.
सदर प्रसंगी विजय परिहार,धरमपाल धिंडवाल, मलकाणी सर, वसंत गिलबिले,दीप सर, श्री पराग सर, कॅप्टन मोहन, श्री नंदनवार, सौ.मुमताजजी शेख, रुप सिंग,डॉ.जानराव चौधरी,श्री सावंत मिलिंद, विविध सोसायटी मधील सेक्रेटरी व चेअरमन उपस्थित होते.

Related posts

बिबवेवाडी “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

कोरोना : भाजपा चे सर्व नगरसेवक एक महिन्याचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देणार!

Vishal Khandagale

कोरोना : कर्मचार्‍यांसाठी मोफत बस सेवा !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX