पुणे

श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर “अथर्वशीर्ष पठण”

Pune City News :- गणेशोत्सव काळात पुण्यात गणपती मंडळांनी साध्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठापणा केली आहे.

तसेच दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर पहाटेच्या सुमारास महिला अथर्वशीर्ष पठण यंदाच्या वर्षी अवघ्या पाच महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात हे पठण करण्यात आले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्यावतीने रविवारी पहाटे १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या पठण कार्यक्रमात शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या पाच महिलांनी प्रातिनिधीक स्वरुपात सहभाग घेतला.

Related posts

किराणा व औषधांची दुकाने 12 तास चालणार

Vishal Khandagale

पुणे महानगपालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर

Vishal Khandagale

पुणे विद्यापीठाची ‘सेट’ परीक्षा लांबणीवर

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX