कोरोनापुणे

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरची उभारणी अंतिम टप्प्यात

Pune City News :- पुणे शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तीन जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत.

त्यातील पहिले कोविड सेंटर सीओईपी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात येत आहे.

हे जम्बो कोविड सेंटर राज्य शासन, पुणे महापालिका, व पीएमआरडीए यांच्या सह भागातून उभारले जात आहेत.

या कोविड सेंटरची क्षमता ८०० बेडची असून त्याची पाहणी अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी शनिवारी( दि.२२)रोजी केली.

या या कोविड सेंटरमध्ये २०० आयसीयू व ६०० ऑक्सिजन बेड्स असणार आहेत. हे कोविड सेंटर लवकरच कोरोना रुग्णांनाच्या उपचारासाठी उपलब्ध होणार असल्याने त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

त्याची पाहणी रुबल अगरवाल यांनी केली. या पाहणीवेळी आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Related posts

महापालिका विषय समिती निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

Vishal Khandagale

पुणेशहरात “संचारबंदी” प्रस्ताव दाखल

Vishal Khandagale

वंचित बहुजन सामाजिक संघाच्या वतीने टाळेबंद काळात देखील “रक्तदान शिबिर” यशस्वी !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX