Pune City News:- मध्य प्रदेशमधील सरकार अस्थिर होत असल्याच्या परिस्थितीवर शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून घणाघाती टीका करण्यात आली आहे.
देशात सध्या विरोधी पक्षांची सरकारं खिळखिळी करणाऱ्या व पाडणाऱ्या ‘राजकीय विषाणू’ने धुमाकूळ घातला आहे’ असे या अग्रलेखात म्हटले आहे.
अग्रलेख संक्षिप्त:
मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार तसेच गुजरातमधील चार आमदारांसाठी भाजपनं काय किंमत मोजली हे जनतेला समजायला हवे.
अरुणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा, कर्नाटक आदी राज्यांमध्ये त्याचा ‘असर’ दिसला आहे. हा ‘विषाणू’ नाकाम ठरला तो फक्त महाराष्ट्रातच. येथे हा व्हायरस चालला नाही आणि त्यांच्यावरच तो उलटला.
मध्यप्रदेशात या विषाणूची खेळी यशस्वी होणार कि उलटणार हे येणार काळ ठरवेल. यात न्यायालयाचा भाग आला तर पुढील गोष्टी महत्वाच्या ठरतील.
दरम्यान, शिवसेनेची ही टीका आणि रोख भाजपाकडे असल्याची चर्चा आहे.

