Pune City News
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक;

PUNE CITY NEWS:- महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज (27एप्रिल) संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुधारित प्रस्ताव पाठवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील कोरोनाची परिस्थिती, राज्यासमोरील आर्थिक आव्हान, पंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी असतील.

● आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे ●

▪️ 9 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. पण उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील ठराव वैध नसल्याचा आक्षेप होता.

▪️ मुख्यमंत्र्यांनी तशा आशयाचं पत्र दिलं की मंत्रिमंडळ बैठक अधिकृत ठरते.

▪️ मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेसाठी शिफारस विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसलेल्या कोणत्याही मंत्र्याला पदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधानसभा अथवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहात निवडून येणं बंधनकारक आहे.

▪️ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपश घेतली. त्यामुळे त्यांची मुदत येत्या 27 मे रोजी संपुष्टात येणार आहे.

▪️ त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी विधानपरिषदेवर आमदार करावे, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली.

▪️ परंतु त्यावर राज्यपालांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही.

Related posts

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी नियमावली

Vishal Khandagale

11 एप्रिलला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

Vishal Khandagale

शिवसेना भवन काही दिवसांसाठी सील…

Vishal Khandagale

Leave a Comment