पुणे शहर :- कल्याणीनगर मध्ये एका घरकाम करणाऱ्या मोलकरणीने लाखो रुपयाच्या सोनं लंपास केलं आहे. मोलकरणीने दागिने चोरल्याच्या काही दिवसांनंतर घर मालकाला ही गोष्ट समजली. या घटनेनंतर पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केली. तसेच या प्रकरणात पोलिसांनी मोलकरणीसह आणखी एकाला अटक केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.
आरोपी मोलकरणीचं नाव सुनिता लष्करे असं आहे. सुनिता ही 30 वर्षांची असून पुण्यात संदीप कुलदीपकुमार ठुसू यांच्या घरी घरकाम करण्यासाठी येत होती. मात्र काही दिवसांपासून तिनं अचानक कामावर जाणं बंद केलं. संबंधित महिलेनं अचानक कामावर येणं बंद का केलं, यावरून फिर्यादी पती-पत्नींमध्ये संशय बळावला. घरातील मौल्यवान वस्तू आणि पैशांची तपासणी त्यांनी केली. तेव्हा घरातील 4 लाख रुपये गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली पण आरोपी महिलेनं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी तिने चोरलेल्या दागिन्यांपैकी एक जोड सोन्याचे कानातील झुमके, एक सोन्याची अंगठी आणि काही चांदीची नाणी जप्त केली आहेत.
दरम्यान, उर्वरित सोनं तिने खालीद सय्यद नावाच्या एका कारागिराला विकलं होतं. पोलिसांनी आरोपी खालीद याच्याकडूनही चोरलेलं सर्व दागिने जप्त केलं असून दोघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

