Pune City News
कसबागुन्हे विषयकपुणे शहर

पुणे शहर पोलिसांच्या 5 जणांच्या पथकावर UP मध्ये हल्ला !

पुणे शहर :-  बुधवार पेठेत मध्यरात्री तडीपार गुंड प्रवीण श्रीनिवास महाजन (वय 36) याने पोलीस हवालदाराचा घरी जात असताना अडवून गळ्यावर आणि पोटात चाकूने वार करून खून केला होता. याप्रकारणाने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांनी गुंड प्रवीण उर्फ पव्या याला पकडले होते. पण, पोलिसांचा खून एका तडीपाराने मध्यवस्तीत येऊन केल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान, त्याच प्रकरणात एक संशयित महिला आरोपीसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यात मग पोलीस या महिलेचा शोध घेत होते. त्यावेळी ही महिला गाझियाबादला पसार झाली असल्याचे समजले. मग तिला शोधण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व त्यांचे सहकारी असे 5 जणांचे पथक गाझियाबाद येथे गेले होते. तिचा शोध घेत असताना ती येथील वेश्या वस्तीत असल्याची माहिती मिळाली. मग पोलिसांनी पुन्हा आणखी दोन महिला कर्मचार्‍यांना गाझियाबाद येथे बोलवून घेतले आणि तिला पकडण्याचा प्लॅन केला.

स्थानिक पोलिसांची एक टीम बोलावली. त्यांना कल्पना दिली. त्यांनी काही अंतरावर नेलेली इनोव्हा कार पार्क केली. त्यानंतर त्या वस्तीत तिचा शोध सुरू केला. दोन टीम करून वेगवेगळ्या रस्त्याने जात होते. पण, पोलिसांचे पथक साध्या वेशात (सिव्हील) असल्याने येथील नागरिकांचा गैरसमज झाला आणि त्यांनी पार्क केलेली पोलिसांची खासगी गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली, असे पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी केले आहे. त्यानंतर स्थानिक नागरिकांकडून पोलिस पथकावर भ्याड हल्ला करण्यात आला. एवढेच नव्हे तर चक्क पोलिसांना लाथा मारण्यात आल्या.

दरम्यान, पोलिसांचे पथक जवळ असतानाच हा हल्ला झाला आहे. या जमावाने प्रचंड गोंधळ घातला होता. स्थानिक पोलिसांनी पटकन धाव घेत आले आणि त्यांनी परिस्थिती हाताळली. आता आपले पथक पुन्हा वापस येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर पकडण्यास गेलेल्या महिलेला पकडले असून, तिला पुण्यात घेऊन हे पथक येत आहे. स्थानिकांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Related posts

लसीकरणाच्या नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Vishal Khandagale

पुणे शहराच्या मध्यवर्तीय भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या LLR टाकीचा कोसळला स्लॅब..

Vishal Khandagale

पुण्यात गाव गुंडांनी फोडली 25 – 30 वाहन

Vishal Khandagale

Leave a Comment