पुणे

कौतुकास्पद मोहीम! कहाणी सांगा; बक्षीस मिळवा!

आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला काहीना काही टेन्शन असतं. परंतु आपले मन मोकळे करण्यासाठी अनेकदा हक्काचा माणूस नसतो.

या पार्श्वभूमीवरच पुण्यातील मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या राज डगवार या विद्यार्थ्याने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.

काय आहे मोहीम? :

▪️ फर्ग्युसन कॉलेज समोरील रस्त्यावर तो हातामध्ये बोर्ड धरून उभा राहतो. या बोर्डवर असं लिहिलं आहे की, तुमची कथा मला सांगा आणि 10 रुपये मिळवा.

▪️ त्याच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले आहे. पुण्यातील आदित्य या तरुणाने देखील राजबाबत सोशल मीडियावर कौतुकाची थाप देणारी पोस्ट शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे.

▪️ या कठीण परिस्थितीत प्रत्येकाला मानसिक ताण असतो. परंतु अनेकजण याला मानसिक आजार समजत असल्याने आपली भीती कुणाकडेही व्यक्त करायला घाबरतात.

▪️ परंतु राज या गोष्टींमधून या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असून त्याच्या या कामातून लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

उपक्रमाबाबत राज म्हणाला… :

▪️ ‘मी 6 डिसेंबरपासून हा उपक्रम सुरु केला असून दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत मी फर्ग्युसन कॉलेज समोरील रोडवर थांबतो.

▪️ या कठीण काळात नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी मी हा उपक्रम सुरु केला आहे.’

▪️ दररोज 5 तास फुटपाथवर घालवून लोकांच्या कथा ऐकत त्यांना मानसिक आधार देण्याचं काम तो करतो.

दरम्यान, आत्तापर्यंत 100 हुन अधिक जणांनी आपले मन मोकळं केले असल्याचे त्याने सांगितले.

Related posts

सुवर्णयुग सहकारी बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता ११ लाख रुपयांची मदत

Vishal Khandagale

कोरोनाच्या पाश्वभूमीवर विविध त्रुटी संदर्भात पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने विभागीय आयुक्तना निवेदन

Vishal Khandagale

कोरोनाच्या विनाशाकरीता ‘दगडूशेठ’ गणपतीला सहस्त्रधारा अभिषेक

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX