महाराष्ट्र

त्या”मुलीला सहआरोपी करावे : रामदास आठवले

RAMDAAS ATHAVALE

PUNE CITY NEWS :- पिंपरीतील पिंपळे सौदागर येथे काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणातून तरुणाची सहा जणांनी हत्या केली होती. हा सर्व प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असा आहे. या प्रकरणामध्ये त्या संबंधित मुलीला सह आरोपी करावे अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

मुलाच्या पीडित जगताप कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी अनेक जणांनी त्यांची भेट घेतली. रामदास आठवले यांनी देखील शनिवारी (दि. १३) सायंकाळी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर पिंपरी येथे पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली.

यावेळी आठवले म्हणाले की, हत्या प्रकरणात पोलिसांनी चांगले काम केले. सहा आरोपींना त्यांनी पकडले आहे. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी तरुणाची आई व आजीने अशी मागणी केली आहे.

Related posts

बारावीच्या परीक्षेसाठी तारखा जाहीर

Vishal Khandagale

पुणे व पिंपरी चिंचवड मधे जमाव बंदी लागू व संचारबंदी नाही!

Vishal Khandagale

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX