Pune City News
पुणे

दारु विक्री करणाऱ्या युवकाचा कोरोनामुळं मृत्यू!

Pune City News:- पुणे शहरातील कोरोना विषाणु चा ‘हॉटस्पॉट’च्या परिसरात रात्रभर दारू विक्री करणाऱ्या युवकाचा सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेने पोलिस प्रशासन व येरवडा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली असून संबंधित युवकाने किती जणांना दारू विक्री केली याची माहिती मिळवणे कठीण झालं आहे. दरम्यान, या युवकाच्या कुटुंबातील सर्वांना क्वॉरंटाईन केले आहे.

येरवडा पोलिस ठाणे अंकित पर्णकुटी पोलिस चौकीच्या हद्दीतील हॉटस्पॉटच्या ठिकाणी राहत असलेला युवक रात्रभर (हातभट्टी) गावठी व विदेशी दारू, ताडी विक्री करीत होता.त्याला काही दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पण झाले. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.सोमवारी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र येरवडा पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. मात्र संबंधित युवकाला कोणामुळे कोरोना झाला? त्यानंतर त्याचा किती जणांनी संपर्क आला हे सांगणे कठीण असल्यामुळे तो राहत असलेल्या
वस्तीतील रहिवासी भयग्रस्त झाले आहेत.

Related posts

रिक्षा पंचायतीचे विधान भवनाबाहेर “जागर उपोषण”

Vishal Khandagale

पुणे महानगरपालिके हद्दीतील मृत्युपास देखील ऑनलाईन मिळणार….

Vishal Khandagale

748 गावांमध्ये राजकीय धुरळा

Vishal Khandagale

Leave a Comment