जम्बो रुग्णालयासाठी महापालिकेकडून जे साह्य लागेल ते तात्काळ देण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
आज रुग्णालयातून करोनामुक्त झालेल्या १५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यावेळी रासने यांनी सर्व रुग्णांशी संवाद साधून त्यांना रुग्णालयातून देण्यात येत असलेल्या सुविधांबाबत माहिती घेतली. स्थायी समिती सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून येथील सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी मानसी देशपांडे, नंदा लोणकर, लता राजगुरु, अमृता बाबर, अशोक कांबळे, बाळा ओसवाल या सर्व स्थायी समिती सदस्यांनी जम्बो कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.
याप्रसंगी उपायुक्त राजेंद्र मुठे, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीमती अंजली साबणे इत्यादी अधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष रासने यांनी जम्बोमधील रुग्णांशी व्हिडीओ कॉलने संपर्क साधून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष रासने म्हणाले, जम्बो कोविड रुग्णालयाची देखभाल महाराष्ट्र शासन व पुणे मनपाकडून केली जात आहे. प्रशासनाकडून येथे समाधानकारक काम केले जात आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असून करोना उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांसोबत इतर आवश्यक औषधेही उपलब्ध आहेत.
व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या सुविधेचा लाभ रुग्ण व नातेवाईक घेत असून नातेवाईकाला रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधता येतो. तसेच माहिती तंत्रज्ञान प्रणाली, देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा योग्य असलेबाबत खात्री करुन या सर्व सुविधांबद्दल रासने यांनी समाधान व्यक्त केले

