Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

केंद्रीय मंत्रालयाचे परिपत्रक पुण्याला लागू नाही !

Pune City News:-कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालय, दिल्ली यांचे दिनांक 24 एप्रिल 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार (टाळेबंदी)लॉकडाऊन कालावधीत दुकाने चालू ठेवण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यानंतर नव्याने प्रसिध्दीस दिलेल्या प्रेसनोटद्वारे नमूद सवलती राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोरोना संक्रमणशील क्षेत्रात लागू होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

पुणे शहरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राज्य शासनाने पुणे शहराचा समावेश रेड झोनमध्ये म्हणजेच संक्रमणशील क्षेत्रात केलेला आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने दुकाने चालू ठेवण्याबाबत जाहीर केलेले परिपत्रक पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू नसून यापूर्वी अंमलात असलेले सर्व मनाई आदेश पुढील काळात कायम राहतील, याची नोंद घ्यावी असे पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी कळविले आहे.

Related posts

“महा ई सेवा” चालकांचे सोमवारपासून आंदोलन !

Vishal Khandagale

जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : डॉ. राजेश देशमुख

Vishal Khandagale

पंजाब: 167 कोरोना संशयित बेपत्ता

Vishal Khandagale

Leave a Comment