Pune City News
पुणे

पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशिअल ऑडिट होणे आवश्यक; आबा बागुल

aba bagul

PUNE CITY NEWS :- शहरांमधील विकास कामांना चालना मिळावी व निधी अभावी आकारास न आलेले मोठे विकास प्रकल्प राबवावे. या स्मार्ट सिटी योजनेच्या उद्धेशाची पुण्यात पायमल्ली झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत केलेली कामे, त्यांची उपयुक्तता, लागलेला कालावधी व खर्च झालेला निधी याचे सोशियल ऑडिट करून ते पुणेकरांपुढे मांडले जावे. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन जल शुद्धीकरण व मैल शुद्धीकरण प्रकल्प, सुरक्षित व वेगवान वाहतुकीसाठी उन्नत मार्ग, रेल्वे  व लोकल रेल्वेसाठी नवीन टर्मिनल्स, सोलर सिटी प्रकल्प, मुठा नदी सुधारणा असे अनेक महत्वकांक्षी व मोठ्या खर्चाचे प्रकल्प स्मार्ट सिटी योजने अंतर्गत होणे अपेक्षित असताना फुटपाथ रुंदीकरण,वृक्षारोपण अशी पुणे महानगरपालिका करीत असलेल्या कामांची पुनरावृत्ती स्मार्ट सिटी योजनेत होत असेल तर त्याचा पुणेकरांना नक्की फायदा काय झाला हा प्रश्न पडला आहे.

त्या साठीच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केलेल्या कामांचे सोशियल ऑडिट होणे गरजेचे आहे. तसेच या योजने अंतर्गत कोणते मोठे प्रकल्प हाती घेतले जावेत. यासाठी पुणेकरांचा सहभागही त्यामध्ये असला पाहिजे. केवळ चांगले मानांकन मिळावे. हा उद्धेश न ठेवता शहरासाठी आवश्यक मोठ्या खर्चाच्या मोठ्या योजना आखून त्याची पूर्तता करणे हेच स्मार्ट सिटी योजनेचे उद्दिष्ट असले पाहिजे .मात्र हे होत नासल्यामुळे सोशियल ऑडिटची मागणी केली आहे असेही आबा बागुल यांनी सांगितले आहे.

Related posts

घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . – आमदार सुनिल कांबळे

Vishal Khandagale

15 जूनपासून महाराष्ट्रात लालपरी पुन्हा धावणार !

Vishal Khandagale

विभागीय आयुक्तांनी घेतला जिल्हा निहाय आढावा

Vishal Khandagale

Leave a Comment