PUNE CITY NEWS:- लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील २ लाख ४ हजार ३२ प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून ३० मे २०२० अखेर १५३ विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
ते म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेश १५, उत्तरप्रदेश ६१, उत्तराखंड २, तामिळनाडू २, राजस्थान ५ , बिहार ३६, हिमाचल प्रदेश १, झारखंड ८, छत्तीसगड ५, जम्मू आणि काश्मिर १, मणिपूर १,आसाम १, ओरीसा २ व पश्चिम बंगाल १२आणि मिझोराम १ अशा एकूण १५३ रेल्वेगाडया २ लाख ४ हजार ३२ प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.

