Pune City News
Uncategorized

एनडीएचा दीक्षांत सोहळा साधेपणाने साजरा !

PUNE CITY NEWS :- पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) १३८ व्या बॅचचा दीक्षांत सोहळा आज (शनिवारी) अत्यंत साधेपणाने व सुरक्षित अंतराचे नियम पाळून साजरा करण्यात आला. दरवर्षी हा दिमाखदार सोहळा अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे. NDA च्या इतिहासात यंदा प्रथमच हा सोहळा साधेपणाने साजरा झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. NDA चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या छात्रांचे शानदार संचलन, विविध प्रकारची साहसी प्रात्यक्षिके, डोळ्यात भरणारी शिस्त, मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती व मार्गदर्शन, पत्रकार व छायाचित्रकारांची गर्दी,

तसेच आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने देशभरातून जमलेले पालक व कुटुंबीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पदवी प्राप्त झाल्यानंतर छात्रांकडून टोप्या आकाशात भिरकवत केला जाणारा जल्लोष हे दरवर्षी असणारे चित्र यंदा पाहायला मिळाले नाही.

Related posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’ चे विभागीय आयुक्तानी केले कौतुक

Vishal Khandagale

देशात कोरोनाग्रस्त 3,374 च्यावर; 77 जणांचा मृत्यू!

Vishal Khandagale

बिहार निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा एल्गार

Vishal Khandagale

Leave a Comment