गुन्हे विषयक

पुण्यात पतीपाठोपाठ पत्नीचीही आत्महत्या..

PUNE CITY NEWS :- पुण्यात आत्महत्येचं सत्र दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी एका कुटुंबाने आत्महत्या केली होती, त्यानंतर एका मंडप व्यावसायिकाने गळफास घेतला होता.

त्यानंतर (रविवारी) सकाळी एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली आहे. मात्र पतीने आत्महत्या केल्याचे पाहून त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

सूरज पालसिंग सोनी (वय २७, न्यू नानापेठ) व करीना पालसिंग सोनी (वय २०) अशी आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आत्महत्या केलेल्या दोन्ही व्यक्ती मूळच्या नेपाळ येथील आहेत. सूरज सोनी हा समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होते. तसेच त्याच इमारतीत राहत देखील होते.

त्या दोघात घरघुती कारणावरून गेल्या तीन दिवसापासून वाद सुरू होते. त्यानंतर करीना यांचा भाऊ त्याठिकाणी आला होता. त्यामुळे त्या भावासोबत बाहेर झोपल्या होत्या. तर सूरज हे घरात झोपले होते. आज (रविवारी) सकाळी करीना या उठल्यानंतर त्यांनी खोलीचे दार वाजवले.

पण दार उघड नसल्याने त्यांनी दार तोडुन आत पाहिले असता सूरज यांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी करीना यांचा भाऊ त्यांच्या भावाला घेऊन येतो असे सांगून तिथून गेला.

त्यानंतर करीना यांनी देखील त्यात खोलीत जाऊन स्वतः आत्महत्या केली. करिनाच्या भावाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related posts

बहिणीपासून लांब रहा, असे म्हणत मुलीच्या भावाचा तरुणावर हल्ला

Vishal Khandagale

२ वर्षा पूर्वीच्या खुनाला येरवडा पोलिसांनी फोडली वाचा !

Vishal Khandagale

50 लाखांच्या खंडणीची मागणी!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX