दोन वर्षा पूर्वी दि. २५/०५/२०१९ रोजी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत , डॉन बॉस्को शाळेच्या मागे बंगला नंबर ९, येरवडा कारागृह महानिरीक्षणालय समोरील बंद गेटच्या आतील बाजूस कचराकुंडी जवळ, झुडूपामध्ये एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह संशयीतरीत्या मिळून आला होता . त्याबाबत सदर मयत इसमाचा खून झाल्याचे येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याबाबत दिनांक ५/०४/२०२१ रोजी तपास पथकाचे सहा.पो.निरीक्षक श्री समीर करपे व पोलीस नाईक अमजद शेख यांना त्याचे गोपनीय बातमीदार यांच्या कडून बातमी मिळाली की , सदर खून हा कुणाल जाधव उर्फ राजा ,राकेश भिसे उर्फ गंदया व निखील यादव उर्फ एनवाय या तिघांनी केला आहे.
सदरची बातमी वरिष्ठांना कळविण्यात आली तपास पथकाचे सहा. पो.नि. सामीर करपे यांनी वरील पैकी २ आरोपींना ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्याबाबत त्यांचे कडे तपास केला असता त्यांनी सदरचा मयत इसम नामे. देवा राठी ब्रम्हशील , लोहगाव, पुणे येथील असून “दारू पिण्याकरिता पैसे न दिल्याच्या कारणावरून वादावादी झाल्याने त्याचा खून केला” होता असे सांगितले सदर आरोपींना अटक केली असून त्यातील एक आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहे. दाखल गुन्ह्या बाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख ,येरवडा पोलीस ठाणे हे करत आहे
सदर ची कारवाई मा. श्री. नामदेव चव्हाण- अप्पर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग पुणे, मा. पंकज देशमुख -पोलीस उप-आयुक्त साहेब परिमंडळ ४ पुणे शहर , मा. श्री किशोर जाधव ,सहा. पोलीस आयुक्त , येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली , श्री युनुस शेख – वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,अजय वाघमारे – पोलीस निरीक्षक (गुन्हे) तापस पथकाचे अधिकारी श्री.समीर करपे- सहा.पोलीस निरीक्षक , सहा.फौज. प्रदीप सुर्वे , बाळासाहेब गायकवाड पो.हवा.गणपत थिकोळे , पोलीस नाईक अमजद शेख , तुषार खराडे , नवनाथ मोहिते , गणेश वाघ , पो. कॉ . अनिल शिंदे ,सुनील नाग्लोट समीर भोरडे ,रुपेश तोडकर , संजय भरगुडे , अजय पडोळे , राहुल परदेशी , विनायक साळवी यांनी केली आहे

